महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत महात्मा जोतीराव फुले यांचे योगदान अतुलनीय आहे. MPSC मुख्य परीक्षेच्या GS 1 पेपरमध्ये समाजसुधारकांवर हमखास प्रश्न विचारले जातात.
सत्यशोधक समाजाची स्थापना आणि उद्दिष्टे
महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात ‘सत्यशोधक समाज’ ची स्थापना केली. यामागील प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे होती:
१. बहुजन समाज, शेतकरी, कामगार आणि स्त्रिया यांची ब्राह्मणी वर्चस्वापासून आणि शोषणातून मुक्तता करणे.
२. शिक्षणाचा प्रसार करून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे.
३. अस्पृश्यता नष्ट करणे आणि सर्वांना समान अधिकार मिळवून देणे.
शिक्षणातील योगदान
त्यांनी १८४८ मध्ये पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. तसेच अस्पृश्यांसाठीही शाळा सुरू केल्या. हंटर कमिशनसमोर त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याची मागणी केली होती.
मुख्य परीक्षेसाठी संभाव्य प्रश्न
प्रश्न: महाराष्ट्रातील सामाजिक प्रबोधनात सत्यशोधक समाजाच्या योगदानाचे मूल्यमापन करा. (२५० शब्द, १५ गुण)
