प्रकरण १: युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास

प्र. (१) युरोपातील धर्मयुद्धे

उत्तर:

(१) अकराव्या शतकाच्या अखेरपासून ते बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीयांत झालेल्या नऊ मुद्द्यांना ‘धर्मयुद्धे’ (क्रुसेडस्) असे म्हणतात.

(२) जेरुसलेम आणि बेथलेहम ही ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्माच्या अनुयायांसाठी पवित्र असलेली शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ही धर्मयुद्धे झाली.

(३) ख्रिस्ती धर्मीयांनी धार्मिक, आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे डोळ्यांपुढे ठेवून ही युद्धे लढवली.

(४) या धर्मयुद्धांचे युरोपच्या धार्मिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रांवर दूरगामी परिणाम झाले.

 

प्र. (२) अल्बेरुनी

उत्तर:

(१) अल्बेरुनी हा मध्य आशियातील एक प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार व तत्त्वचिंतक होता. गझनीच्या सुलतान महमूदबरोबर तो भारतात आला.

(२) त्याने पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केला होता.

(३) अक्षांश-रेखांश ठरवण्याची त्याची पद्धत बिनचूक होती.

(४) त्याने पृथ्वीचा गोल नकाशा तयार केला. त्या काळात कोणतीही आधुनिक साधने आणि ज्ञान उपलब्ध नसताना हे काम करणे अत्यंत कठीण होते.

 

प्र. (३) भांडवलशाही अर्थव्यवस्था

उत्तर:

(१) ज्या अर्थव्यवस्थेत उद्योगधंद्यांची मालकी किंवा त्यातील गुंतवणूक खाजगी मालकीची असते, अशा व्यवस्थेला ‘मांडवलशाही अर्थव्यवस्था’ असे म्हणतात.

(२) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत वस्तूंचे उत्पादन कमी किमती कमी श्रमाचा मोबदला कमी देण्याचा निर्णय घेता येतो.

(३) जास्तीत जास्त नफा कमावणे हे भांडवलशाहीचे मुख्य उद्दिष्ट अस्ते त्यामुळे या अर्थव्यवस्थेत कामगारांची पिळवणूक होते.

(४) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उपभोक्त्याला वस्तूंच्या निवडीचे स्वातंत्र्य असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 iaseasyway.com