प्र. ५ विधाने आणि तर्क प्रश्न – पुढील पर्यायांमधील योग्य पर्याय निवडा :
(१) विधान (अ) : सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तुलनेने मर्यादित आहे.
तर्क विधान (ब) : सूक्ष्म अर्थशास्त्रात केवळ वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो.
पर्याय :
(१) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.
(२) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ सत्य आहे.
(३) दोन्ही विधाने सत्य असून, ‘ब’ विधान हे ‘अ’ विधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते.
(४) दोन्ही विधाने सत्य असून, ‘ब’ विधान हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
उत्तर : (३) दोन्ही विधाने सत्य असून, ‘ब’ विधान हे ‘अ’ विधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते.
(२) विधान (अ) : स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न विश्लेषण म्हणून ओळखले जाते..
तर्क विधान (ब) : स्थूल अर्थशास्त्रात विशिष्ट व्यक्तीने किंवा विशिष्ट उत्पादन संस्थेने प्राप्त केलेल्या उत्पन्नाचा अभ्यास केला जातो.
पर्याय :
(१) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.
(२) विधान ‘अ’ असत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’
सत्य आहे.
(३) दोन्ही विधाने सत्य असून, ‘ब’ विधान हे ‘अ’ विधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते.
(४) दोन्ही विधाने सत्य असून, ‘ब’ विधान हे विधान ‘अ’ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
उत्तर : (१) विधान ‘अ’ सत्य आहे, पण तर्क विधान ‘ब’ असत्य आहे.