योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा:

1)संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या समतोलाचे/संतुलनाचे विवेचन करणारा समतोलाचा/संतुलनाचा प्रकार.

उत्तर : समग्र समतोल / संतुलन

2) आर्थिक चलांचे समुच्चयात्मक परिमाण.

उत्तर : समग्रलक्षी / समग्र आर्थिक चले

3) विशिष्ट घटकाच्या समतोलाचे/संतुलनाचे विवेचन करणारा समतोलाचा/संतुलनाचा प्रकार.

उत्तर : आंशिक समतोल/संतुलन

4) आर्थिक चलांचे सूक्ष्म परिमाण.

उत्तर : सूक्ष्मलक्षी / सूक्ष्म

5) भांडवलाचा मोबदला.

उत्तर : व्याज

6) पावसाळ्यात रेनकोटमधून मिळणारी उपयोगिता.

उत्तर : काल उपयोगिता

7) संगणकाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संगणकातून मिळणारी उपयोगिता..

उत्तर : ज्ञान उपयोगिता

8) अशी वस्तू जिचे लहान परिमाणांत विभाजन करता येत नाही.

उत्तर : अविभाज्य वस्तू

9) मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूतील क्षमता.

उत्तर : उपयोगिता

10) आरोग्यासाठी हितकारक ठरणारा वस्तूतील गुणधर्म.

उत्तर : उपयुक्तता

11) एखादया काळानुसार उपयोगाच्या वाढत्या वस्तूची वाढणारी उपयोगिता.

उत्तर : काल उपयोगिता

12) अशी परिस्थिती, जेथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते.

उत्तर : मागणीचा विस्तार

13) मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण.

उत्तर : मागणी वक्र

14) अशी वस्तू, जी अनेक उपयोगांसाठी वापरली जाते.

उत्तर : अनेक उपयोगी वस्तू

15) किंमत स्थिर असताना इतर घटकांतील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते.

उत्तर : मागणीतील वाढ

16) अशी इच्छा, जिला खरेदीशक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते.

उत्तर : मागणी

17) एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते.

उत्तर : संमिश्र मागणी.

18) फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल.

उत्तर : मागणीची उत्पन्न लवचीकता

19) एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूंच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम.

उत्तर : मागणीची छेदक लवचीकता

20) किमतीतील बदलांमुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल.

उत्तर : मागणीची किंमत लवचीकता

21) मागणीतील अनंत बदलांमुळे होणारी लवचीकता.

उत्तर : मागणीची पूर्णतः लवचीकता

22) किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचीकता.

उत्तर : मागणीची एकक लवचीकता

23) स्थिर घटकावर केला जाणारा खर्च.

उत्तर : स्थिर खर्च

24) प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च.

उत्तर : सरासरी खर्च

25) एका जादा नगसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ.

उत्तर : सीमांत खर्च

26) प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती.

उत्तर : सरासरी प्राप्ती

27) कच्च्या मालावर केला जाणारा खर्च.

उत्तर : बदलता खर्च.

28) काही/थोडे विक्रेते असलेला बाजार.

उत्तर : अल्पाधिकार

29) मागणी वक्र आणि पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू.

उत्तर : समतोल बिंदू

30) वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च.

उत्तर : विक्री खर्च

31) एकजिनसी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय.

उत्तर : उद्योग

32) एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे.

उत्तर : मूल्यभेद

33) दोन भिन्न कालावधींत एखादया चलात झालेल्या बदलांचे मापन करणारे सांख्यिकीय साधन.

उत्तर : निर्देशांक

34) दोन भिन्न कालावधींत वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या बदलांचे मापन करणारा निर्देशांक.

उत्तर : किंमत निर्देशांक

35) दोन भिन्न कालावधींत श्रमिकांच्या उत्पादकतेत झालेल्या बदलांचे मापन करणारा निर्देशांक.

उत्तर : श्रम उत्पादकता निर्देशांक

36) दोन भिन्न कालावधींत केवळ एका चलात झालेल्या बदलांचे मापन करणारा निर्देशांक.

उत्तर : एकीकृत निर्देशांक

37) दोन भिन्न कालावधींत एका चलाच्या गटापासून तयार करण्यात आलेला निर्देशांक.

उत्तर : संयुक्त निर्देशांक

38) भूमी या उत्पादन घटकाचा पैशातील मोबदला.

उत्तर : खंड

39) श्रम या उत्पादन घटकाचा पैशातील मोबदला.

उत्तर : वेतन

40) उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू आणि यंत्रसामग्रीची होणारी झीज.

उत्तर : घसारा

41) एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह.

उत्तर : राष्ट्रीय उत्पन्न

42) एका वर्षाच्या कालावधीतील निर्यात मूल्य आणि आयात मूल्य यांतील फरक.

उत्तर : निव्वळ निर्यात.

43) समाजाला महत्तम लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने केलेले वित्त व्यवहार.

उत्तर : सार्वजनिक वित्त व्यवहार

44) शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर केला जाणारा खर्च.

उत्तर : महसुली खर्च

45) कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीने शासनाला दिलेले सक्तीचे देणे.

उत्तर : कर

46) कायद्याचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीला भरावी लागणारी रक्कम.

उत्तर : दंड

47) देशाबाहेरील आर्थिक स्रोतांच्या आधारे शासनाने उभारलेले कर्ज.

उत्तर : बाह्य कर्ज

48) आगामी आर्थिक वर्षातील सरकारची अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण.

उत्तर : शासकीय अंदाजपत्रक

49) दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्हणून कंपन्या किंवा सरकारद्वारे प्रस्तुत केलेले कर्जसाधन.

उत्तर : रोखे

50) एखादया व्यक्तीने किंवा समूहाने खरेदी केलेले कंपनीचे समभाग.

उत्तर : समभाग

51) वित्तीय प्रतिभूतींच्या संदर्भाने एखादया मूलभूत मालमत्तेचे मूल्य किंवा किंमत हा रोखेभाग, चलन, व्याजदर, वस्तू इत्यादींमार्फत प्राप्त करणे.

उत्तर : व्युत्पत्र भांडवल

52) परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे साधन.

उत्तर : सरकारी रोखे

53) वस्तूंच्या देयकामध्ये व्यापाऱ्याद्वारे काढलेली व स्वीकारलेली विनिमय बिले.

उत्तर : व्यापारी बिले

54) एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला वित्तीय साधनाद्वारे मागणीनुसार किंवा भविष्यातील तारखेला निश्चित रक्कम देण्याबद्दल दिलेले लेखी वचन.

उत्तर : वचनपत्र

55) मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी.

उत्तर : मागणी ठेवी

56) एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तूंची व सेवांची खरेदी.
उत्तर : आयात व्यापार

57) एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तूंची व सेवांची विक्री.

उत्तर : निर्यात व्यापार

58) एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी.

उत्तर : व्यवहारतोल

59) विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यांतील फरक.

उत्तर : व्यापारतोल विधान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 iaseasyway.com