प्रकरण १: युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास
प्र. (१) वास्को-द-गामा याच्या कार्याची माहिती दया.
उत्तर : तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकल्यामुळे भारताकडे येण्याचा नवा सागरी मार्ग शोधण्यासाठी या मोहिमा निघाल्या. त्यात वास्को-द-गामा याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
(१) १४९७ मध्ये ४ जहाजे व १७० खलाशी घेऊन गामा पोर्तुगालहून भारताच्या शोधमोहिमेवर निघाला.
(२) बार्थोलोम्यू डायस ज्या मागनि मेला, त्याच मार्गाने तो केप ऑफ गुड होपपर्यंत आला.
(३) आफ्रिकेच्या या दक्षिण टोकाला वळसा मारून तेथील मालिंदी या बंदरातील
एका भारतीय वाटाड्याच्या मदतीने १४९८ मध्ये तो भारताच्या कालिकत (कोझीकोडे). बंदरात पोहोचला.
(४) सागरी मार्गाने भारतात येणारा तो पहिला युरोपीय होय.
(५) कालिकतचा राजा झामोरीन याच्याकडून व्यापाराची परवानगी घेऊन तो पोर्तुगालला परतला.
(६) गोवा व कोची येथे पोर्तुगिजांचे राज्य स्थापन झाल्यावर तो पहिला व्हाइसरॉय झाला.
(७) त्याच्या प्रयत्नाने भारत आणि पोर्तुगाल यांच्यात व्यापारी संबंध प्रस्थापित झाले..
प्र. (२) गॅलिलिओ याचे आणि खगोलशास्त्रातील योगदान स्पष्ट करा.
उत्तर : गॅलिलिओ हा प्रबोधनकाळातील प्रमुख खगोलशास्त्रज्ञ होता. त्याने भौतिक व खगोलशास्त्रात पुढील योगदान दिले –
(१) इसवी सन १६०९मध्ये गॅलिलिओने सुधारित दुर्बीण तयार केली. त्यामुळे गील संशोधनाला गती मिळाली.
(२) या सुधारित दुर्बिणीचा फायदा दर्यावर्दाना झाला. समुद्रातील दूरवरची छोटी- मोठी भूमी शोधणे त्यांना सोपे जाऊ लागले.
(३) दुर्बिणीच्या साहाय्याने त्याने गुरू ग्रहाचे चार मोठे व तेजस्वी उपग्रह शोधले.
(४) चंद्र गुळगुळीत व स्वयंप्रकाशी असल्याचे ॲरिस्टॉटलचे मत खोडून ‘चंद्रावर डोंगर व दन्या असून तो स्वयंप्रकाशी नाही; तर सूर्यप्रकाशाच्या परिवर्तनाने प्रकाशतो, ‘ हे स्थाने साधार सिद्ध केले.
(५) सूर्याला स्वतःभोवती फेरी मारण्यास २७ दिवस लागतात, असे त्याने सांगितले.
(६) सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारा गॅलिलिओ हा पहिला खगोलशास्त्रज्ञ होता.
(७) त्याने कोपर्निकस व केपलर यांच्या संशोधनाला वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे संमती दिली; त्यामुळे भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळाली.
(८) ‘भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेग सारखाच असतो. या सिदुघांताच्च सत्यता त्याने पिसाच्या झुकल्या मनोन्यात प्रयोग करून पटवून दिली. त्यामुळे अरिस्टॉटलचे मत खोडले गेले. (९) गॅलिलिओने ‘निरीक्षण करून सिद्धांत मांडणे’ ही तर्कशुद्ध पद्धती रूढ केली.
(१०) गॅलिलिओच्या या योगदानामुळे त्याला ‘आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक’ असे म्हणतात.
प्र. (३) प्रबोधनकाळात वस्त्रोद्योग व्यवसायात झालेल्या प्रगतीचा आढावा घ्या.
उत्तर : वस्त्रोद्योग हा पूर्वापार चालत आलेला घरगुती व्यवसाय होता. प्रबोधनकाळात प्रथम इंग्लंडमध्ये या व्यवसायात अनेक शोध लागले, ते पुढीलप्रमाणे
(१) इसवी सन १७३८ मध्ये जॉन के याने ‘घावता घोटा’ तयार केला. त्यामुळे वस्त्रे विणण्याच्या कामाची गती वाढलो. –
(२) जेम्स हरग्रीव्हज याने तयार केलेल्या स्पिनिंग जेनी या यंत्रामुळे एकाच वेळी आठ रिळे लावता येऊ लागली. त्याचा फायदा म्हणजे कामगारांचे श्रम कमी होऊन कामाचा वेग वाढला.
(३) इसवी सन १७६९मध्ये रिचर्ड आर्कराइट याने सूत कातण्यासाठी बनवलेल्या यंत्राने पीळदार व मजबूत धागे वेगाने तयार होऊ लागले.
(४) इसवी सन १७७९ मध्ये सॅम्युएल क्रॉम्प्टन याने तयार केलेल्या ‘म्यूल’ या सुधारित सूतकताई यंत्रामुळे वस्त्रे बनवण्याच्या कामाचा वेग दोनशे पटींनी वाढला.
(५) इसवी सन १७८३ मध्ये बेल याने तयार केलेल्या ‘रोलर सिलिंडर प्रिंटिंग’ या यंत्रामुळे कापडावर छपाई करता येणे शक्य झाले..
(६) इसवी सन १७८५ मध्ये एडमंड कार्टराईट याने बनवलेल्या यंत्रमागामुळे उत्पादन वाढीस वेग आला.
(७) इसवी सन १७९३ मध्ये शोध लागलेल्या ‘कॉटन जीन’ या यंत्रामुळे कापसातून सरकी वेगळी करता येणे शक्य झाले.
(८) जेम्स वॅटने तयार केलेले स्टीम इंजिन वस्त्रोद्योगातही वापरले जाऊ लागले.
(९) कपडे शिवण्यासाठी शिलाई यंत्रे तयार झाली. वस्त्रोद्योग क्षेत्रात लागलेल्या या शोधांमुळे कापडाचे उत्पादन वाढून इंग्लंडचा व्यापार भरभराटीस आला.