प्रकरण ८: जागतिक महायुद्धे आणि भारत
प्र. (१) दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा.
उत्तर :
१९३९ ते १९४५ या दीर्घ काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची कारणे पुढीलप्रमाणे :-
(१) पहिल्या महायुद्धानंतर विजेत्या राष्ट्रांनी व्हर्सायच्या तहात जर्मनीवर अपमानास्पद अटी लादल्यामुळे जर्मनी व तिच्या मित्रराष्ट्रांमध्ये असंतोष निर्माण झाला.
(२) जर्मनीत नाझी हिटलरने सत्ता हस्तगत करून व्हर्सायचा तह फेटाळून लावला.
(३) त्याने लष्करी सामर्थ्य वाढवून जर्मनीला पुन्हा सामर्थ्यशाली बनवले. सैन्यबल, आरमार आणि वायुदल समर्थ करण्यावर भर दिला.
(४) सोव्हिएट रशिया हे साम्यवादी राष्ट्र या काळात समर्थ बनत होते. रशिया बलिष्ठ होणे हे भांडवलशाही राष्ट्रांना खुपत होते. रशिया जर्मनीचा शत्रू असल्याने जर्मनीच्या आक्रमक धोरणांकडे इंग्लंड व फ्रान्सने दुर्लक्ष केले.
(५) १९३८मध्ये जर्मनीने चेकोस्लाव्हाकियाचा सुडेटन प्रांत जिंकला. पोलंड या सर्व राष्ट्रांनी मान्य केलेल्या तटस्थ राष्ट्रावर १९३९मध्ये हिटलरने आक्रमण केले.
(६) शांतता टिकवण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रसंघाला आक्रमक राष्ट्रवाद व लष्करवाद यांना वेळीच आळा घालता आला नाही. जर्मनी, इटली, जपान या राष्ट्रांच्या आक्रमक धोरणाकडे राष्ट्रसंघाने दुर्लक्ष केले.
(७) पहिल्या महायुद्धानंतर युरोपात शस्त्रास्त्रनिर्मिती स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक राष्ट्र प्रगत व विध्वंसक शस्त्रे तयार करू लागल्याने युरोप दारूगोळ्यांनी भरलेले कोठार बनले. शस्त्रास्त्रवाढ, आक्रमक राष्ट्रांच्या कृतींकडे दुर्लक्ष, गटबाजीचे धोरण या कारणांमुळे १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले.
प्र. (२) ऑस्ट्रिया सर्विया यांच्यातील युद्धाला जागतिक युद्धाचे स्वरूप कसे प्राप्त झाले ?
उत्तर :
(१) सर्बियन नागरिकाने ऑस्ट्रियन राजपुत्राचा खून केल्यानंतर ऑस्ट्रियाने सर्वियावर आक्रमण केले.
(२) सर्वियाच्या मदतीला रशिया धावून आला.
(३) ऑस्ट्रिया-हंगेरी यांनी सर्बियावर दडपशाही करायला सुरुवात केली.
(४) जर्मनी ऑस्ट्रियाची बाजू घेऊन युद्धात उतरली.
(५) बेल्जियम हा वटस्थ देश असूनही जर्मनीने वेल्जियमवर आक्रमण करून तो देश जिंकला.
(६) बेल्जियमला पाठिंबा दिला.
(७) इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांनी जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले.
(८) जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी, तुर्कस्तान व बलोरिया या अक्ष-राष्ट्रांचा गट तयार झाला.
(९) इंग्लंड, फ्रान्स, रशिया हा दोस्त राष्ट्रांचा दुसरा गट तयार झाला.
(१०) इटली दोस्त राष्ट्रांच्या गटात उशिरा सामील झाली.
(११) महायुद्धाच्या अखेरच्या कालखंडात अमेरिका दोस्त राष्ट्रांच्या गटात सहभागी झाले.
अशा रितीने एक एक राष्ट्र युद्धात उतरत गेले आणि अक्ष राष्ट्रांचा गट विरुद् दोस्त राष्ट्रांचा गट यांच्यात महायुद्ध लढले गेले. दोन देशांतील युद्धाला जागतिक महायुद्धाचे स्वरूप प्राप्त झाले.
प्र. (३) दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात घडलेल्या जागतिक घटनांचा आढावा घ्या?
उत्तर :
१९३९ ते १९४५ या काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडाल वडलेल्या महत्त्वपूर्ण घटना :-
(१) १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेने दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली.
(२) जर्मनीने डेन्मार्क व नॉवेंवर आक्रमण करून हे दोन देश जिंकले.
(३) त्यानंतर जर्मनीने हॉलंड व बेल्जियम जिंकले.
(४) फ्रान्सची अभेद्य तटबंदी फोडून जर्मनीने १९४०मध्ये फ्रान्स जिंकले.
(५) फ्रान्सच्या आक्रमणावेळीच जर्मनीने इंग्लंडवर हल्ला केला.
(६) इंग्लंडच्या फौजा असलेल्या डंककंवर हल्ला केला. इंग्लंडने या बंदरात असलेले अडीच लाख सैनिक जर्मनीच्या हल्ल्यातून सुखरूप हलवले, ही या महायुद्धातील महत्त्वपूर्ण घटना होय.
(७) हिटलरने सोव्हिएट रशियाशी केलेला अनाक्रमणाचा करार मोडून रशियावर आक्रमण केले.
(८) १९४३ मध्ये स्टॅलिनग्राड येथे नाझी फौजा रशियन सैन्याच्या कोंडीत सापडल्या. मार्शल झुकॉव्हने जर्मन सैन्याचा केलेला पराभव या महायुद्धाला कलाटणी देणारा ठरला.
(९) जर्मन सैन्याची पीछेहाट होतानाच इटलीच्या मुसोलिनीचाही अंत झाला.
(१०) उत्तर आफ्रिकेतही जर्मनीचा पराभव झाला. जर्मनीच्या बाजूने उतरलेल्या जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. यामुळे जपान शरण आले. या घटनेने दुसरे जागतिक महायुद्ध समाप्त झाले.