प्रकरण ६ : वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
प्र. (१) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केलेल्यांचे उठावातील योगदान स्पष्ट करा.
उत्तर : १८५७ च्या उठावात अनेक संस्थानिक आणि सेनानींनी उठावाचे नेतृत्व केले, त्यांचे योगदान पुढीलप्रमाणे:-
(१) लखनौ, मेरठ येथून दिल्लीकडे कूच केलेल्या सैनिकांनी दिल्ली सर करून मुघल बादशाह बहादूरशाह यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले. इंग्रजांनी दिल्लीवर लक्ष केंद्रित करून दिल्ली जिंकली. ब्रिटिश जनरल हडसन याने बहादूरशाहला अटक करून रंगून येथे नजरकैदेत ठेवले.
(२) बिहारमधील जमीनदार कुंवरसिंह यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये उठाव झाला. झारखंडमधील हजारीबाग, ओडिशातील देवगड, संबळपूर या ठिकाणी कुंवरसिंहना चांगला प्रतिसाद मिळाला.
(३) नानासाहेब पेशवे यांनी कानपूर येथे उठावाचे नेतृत्व केले. नानासाहेब व तात्या टोपे यांनी कानपूर आपल्या ताब्यात ठेवण्याचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. कमांडर कॉलीन कॅम्पबेल याने तात्या टोपेंचा पराभव करून कानपूर पुन्हा मिळवले..
(४) अवधच्या बेगम हजरत महल यांनीही सुरुवातीस चांगले यश मिळवले.
(५) मौलवी अहमदडल्ला याने लखनौवर मिळवलेले वर्चस्व कॅम्पबेलने संपवले.
(६) राणी लक्ष्मीबाई यांच्या नेतृत्वाखाली उठावकर्ते झाशी येथे संघटित झाले. तात्या टोपेही राणीच्या मदतीला आले. परंतु ह्यू रोज याने त्यांचा पराभव केला. काल्पीच्या लढाईत राणीला वीरमरण आले.
(७) महाराष्ट्रात रंगो बापूजी गुप्ते यांनी साताऱ्यात केलेला उठाव अयशस्वी ठरला.
(८) नरगुंदचे संस्थानिक बाबासाहेब भावे, खानदेशात भीमा नाईक व कजारसिंह यांनीही उठाव केले.
(९) कोल्हापुरात चिमासाहेब यांचा उठावही अयशस्वी ठरला.
प्र. (२) मवाळवादी आणि जहालवादी यांच्या विचारसरणीतील फरक स्पष्ट करा?
उत्तर :
राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर थोड्याच काळात कार्यकर्त्यांमध्ये दोन गट यांग झाले. या दोन गटांच्या विचारसरणीत पुढील फरक होता:-
(१) स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल ही जहालगटाची विचारसरणी होती; तर समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे म्हणून आधी सुधारणा व मग स्वातंत्र्य, असा वाळवादयांचा विचार होता.
(२) ‘आधी आपण सुधारले पाहिजे, आपले घर सुधारले पाहिजे, मग स्वातंत्र्य मिळवू,’ असे सुधारकांचे अग्रणी आगरकर यांचे मत. तर ‘हे घरच माझे नाही, आधी ताब्यात घेऊ, मग हव्या त्या सुधारणा करू,’ हे जहालांचे अग्रणी लोकमान्य टिळक चे मत.
(३) ‘समाज सुधारण्यासाठी ब्रिटिशांची मदत घ्यायला हरकत नाही,’ असे वाळवादयांचे मत होते; तर ‘आधी स्वातंत्र्य नंतर सुधारणा,’ असे जहालांचे मत होते..
(४) आपली गाऱ्हाणी सरकारला साधार पटवून दिली, तर सरकार आपल्याला निराश करणार नाही, असे मवाळवादयांचे प्रामाणिक मत होते. तर अर्ज, विनंत्या अगर भाषणे करून इंग्रजी सत्ता बधणार नाही, असे जहालांचे ठाम मत होते.
(५) इंग्रजांच्या न्याय्यबुद्धीवर मवाळवादयांचा विश्वास होता. संघटन कार्यातून भक्कम पाया उभा केला पाहिजे, या मताचे मवाळवादी होते. तर व्यापक जनआंदोलनाच्या मार्गानेच स्वातंत्र्य मिळेल. त्यासाठी स्वदेशी, बहिष्कार अशा जहाल मार्गांचा अवलंब पाहिजे, असे जहालवादयांचे ठाम मत होते.
राष्ट्रीय सभेच्या उद्दिष्टांबाबत दोन्ही गटांत एकमत असले, तरी ती उद्दिष्टे कोणत्या मार्गाने साध्य करायची, त्या मार्गाबाबत मात्र दोन्ही गटांत मतभेद होते.
प्र. (३) उमाजी नाईक यांच्या उठावाचे वर्णन करा?
उत्तर :
(१) सातारा जिल्ह्यात रामोशी समाजाच्या लोकांनी चितूरसिंग यांच्या मृत्वाखाली केलेल्या उठावात उमाजी नाईक आणि संतू नाईक हे आघाडीवर होते.
(२) त्यांनी पुण्याहून मुंबईला जाणारा सावकारी ऐवज ताब्यात घेतला.
(३) १८२४ मध्ये उमाजी नाईक यांनी पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी ताब्यात घेतली.
(४) या प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच उमाजी नाईक आणि त्यांचे साथीदार यांना पकडण्यासाठी सरकारने पाच हजार रुपयांचे इनाम लावले, गावकऱ्यांनी त्यांना अन्न वस्त्र, निवारा व पैसे न देण्याचा आदेश काढला.
(५) उमाजींबद्दलची माहिती सरकारला दिलीच पाहिजे व आदेश न पाळणाऱ्यांची वतने जप्त केली जातील, असेही सरकारने जाहीर केले. शरण येणाऱ्यांना माफी देण्याचे आश्वासन दिले गेले.
(६) कॅप्टन डेव्हिसच्या घोडदळाला उमाजी नाईक यांना शोधण्यात अपयश आले.
(७) सातारा, वाई, भोर, कोल्हापूर या भागांत उमाजींचा संघर्ष चालू होता.
(८) इंग्रजांना ठार मारण्याचे आदेश उमाजींनी दिलेले होते.
(९) कॅप्टन मॅकिन्टोशने उमाजींचा सतत पाठलाग केला. अखेरीस भोरजवळ त्यांना पकडण्यात आले.
(१०) उमाजी नाइकांवर खटला भरण्यात येऊन त्यांना फाशी देण्यात आले.
प्र. (४) भिल्लांच्या उठावाची माहिती लिहा?
उत्तर:
पेशवाईच्या शेवटच्या कालखंडात खानदेश भागात भिल्ल जमातीन ब्रिटिशांविरुद्ध अनेकदा उठाव केले. हे उठाव इंग्रजांनी कधी दडपशाहीने; तर कधी सामोपचाराने मिटवले. या उठावांची माहिती:-
(अ) १८१८ चा उठाव :
(१) खानदेश १८१८ साली ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यावर सातपुडा, सातमाळा आणि परिसरातील भिल्ल एकत्र आले.
(२) कैदेतून निसटलेल्या त्रिंबकजी डेंगळे यांच्या प्रेरणेने त्यांचे पुतणे गोंदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली हजारो भिल्लांनी उठाव केला.
(३) कॅप्टन ब्रिग्ज याने भिल्लांची रसद बंद करून त्यांची कोंडी केली.
(४) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने सामोपचाराचे धोरण स्वीकारत मिल्लतांनाच वाटसरूंचे संरक्षण करण्याच्या कामावर नेमले..
(५) काही भिल्लांना नोकऱ्या व पेन्शन दयायला सुरुवात केली.
(६) एकाच वेळी भिल्लांना सवलती देऊन व त्याच वेळी त्यांची गळचेपी करून त्यांना शरण यायला इंग्रजांनी भाग पाडले.
(ब) १८२२ चा उठाव :
(१) १८२२ मध्ये ‘हरिया’ या भिल्लांच्या म्होरक्याने केलेला उठाव कॅप्टन रॉबिन्सन याने दडपून टाकला.
(२) लेफ्टनंट ऑग्रॅम याने भिल्लांनी केलेला उठावही मोडून काढला.
(३) भिल्लांना विश्वासात घेऊन शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला.
(४) त्यांच्या पूर्वीच्या गुन्हयांना माफी दिली गेली. त्यांना जमिनी देण्यात आल्या. भिल्लांची सैन्यात भरती केली गेली. अशा रितीने सामोपचाराचे धोरण स्वीकारून भिल्लांचे उठाव कमी करण्याचा प्रयत्न