प्रकरण ५: भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा
प्र. (१) राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला होता?
उत्तर : भारतातील आदा समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजा राममोचन रॉय यांनी पुढील सुधारणांचा आग्रह धरला होता :-
(१) त्यांनी सती पद्धतीला विरोध केला. प्राचीन संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करून स्थांनी सिद्ध केले की, धर्मग्रंथांमध्ये सती जाणे हे धर्मकर्तव्य असल्याचा कोठेही उल्लेख नाही.
(२) समाजातील बालविवाह पद्धतीला त्यांनी विरोध केला.
(३) स्त्रिया असलेल्या पडदा पद्धतीला त्यांचा विरोध होता. पापतीमुळे स्त्रियाच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात, असे त्यांचे मत होते.
(४) ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मूर्तिपूजेची गरज नाही, असे रॉय यांचे मत होते म्हणून त्यांनी ब्राहमी समाजाची स्थापना करून मूर्तिपूजेस विरोध केला.
(५) ईश्वर एकच आहे, हा विचार त्यांनी मांडला. अनेकेश्वरवादाला त्यांचा विरोध होता
(६) आत्मीय सभेची स्थापना करून सर्व धर्मातील समान तत्त्वे शोधणाऱ्या आणि समाजातील अंधश्रद्घांवर आघात करणान्या राजा राममोहन रॉय यांनी समाजसुधारणेचा
सतत आग्रह धरला. आपल्या लेखनातून त्यांनी आधुनिक विचारांची पायाभरणी केली.
प्र. (२) सर सय्यद अहमदखान यांनी केलेले कार्य लिहा ?
उत्तर:
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धति भारतात समाजप्रबोधन चालू होते. अनेक समाजसुधारक सामाजिक-धार्मिक सुधारणा करण्याचे कार्य करीत होते. मुस्लीम समाजातही सर सय्यद अहमदखान यांनी सामाजिक सुधारणेचे पुढील कार्य केले-
(१) त्यांनी १८६४ मध्ये मुस्लिमांसाठी ‘सायंटिफिक सोसायटी’ची स्थापना केली.
(२) या संस्थेमार्फत इतिहास, विज्ञान व राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला जात असे. त्यांनी मुस्लीम समाजाला या विषयांची ओळख करून दिली.
(३) १८७५ मध्ये अहमदखान यांनी ‘मुहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेज ची स्थापना केली. पुढे या कॉलेजचे रूपांतर ‘अलिगढ़ मुस्लीम युनिव्हर्सिटी मध्ये झाले. या शैक्षणिक संस्थेमुळे मुस्लिमांमध्ये शिक्षणाची ओढ लागली, मुस्लीम मुले-मुली इच्च शिक्षण घेऊ लागली.
(४) अहमदखान यांनी ‘मोहम्मदन सोशल रिफॉर्मर’ या नावाचे नियतकालिक काढून त्याद्वारे आधुनिक विचार मुस्लीम समाजात रुजवले.
(५) अहमदखान यांनी आपल्या ग्रंथातून, नियतकालिकातून आणि शैक्षणिक संस्थांतून आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला.
(६) अबुल फैज याने सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर लिहिलेल्या ‘आइन- ए-अकबरी’ या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले.
प्र. (३) रामस्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा?
उत्तर:
प्रभावी वक्ते, लेखक आणि गांधीवादी विचारसरणीचे असणारे रामस्वामी नापकर यांनी समाजसेवेचे पुढील कार्य केले :-
(१) महात्मा गांधींचा स्वदेशीचा विचार समाजात रुजवला.
(२) सर्व जातींना मंदिर प्रवेश असावा, यासाठी प्रयत्न केले.
(३) अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या ‘वायकोम सत्याग्रहात भाग घेतला.
(४) तमिळनाडूमध्ये त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू केले.
(५) समाजातील वर्णव्यवस्था, बालविवाह या प्रथांच्या विरोधात लढा उभारला.
(६) स्त्रियांचे हक्क, संततिनियमन या विषयांवर आपले क्रांतिकारक विचार मांडून समाजाला सुधारण्याचा प्रयत्न केला. आपल्या समाजोपयोगी कार्यामुळे रामस्वामी नायकर यांना लोक ‘पेरियार’ म्हणजे महान आत्मा म्हणून ओळखू लागले.
प्र. (४) स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी समाजसुधारकांनी कोणते प्रयत्न केले ?
उत्तर:
श्रद्धा, स्त्रियांवर अन्याय करण्याच्या डी-परंपरा नष्ट एकोणिसाव्या शतकात अनेक समाजसुधारकांनी पुढील प्रयत्न केले :-
(१) राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध आवा धर्मग्रंथांचा आधार नाही, हे सिद्ध केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे १८२९ साली लॉर्ड बेंटिकने तीबंदीचा कायदा केला.
(२) रॉय यांनी बालविवाह व पडदा पद्धतीलाही विरोध केला.
(३) प्रार्थना सभेच्या कार्यकत्यांनी स्त्री-पुरुष समानतेची चळवळ सुरू करून स्त्री-शिक्षणसंस्था काढल्या.
(४) महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणाचे कार्य केले. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांनीही स्त्री-शिक्षणाचे कार्य केले.
(५) आर्य समाज आणि रामकृष्ण मिशननेही स्त्री-शिक्षण, विधवा पुनर्विवाह त्यादी कार्याला प्राधान्य दिले.
(६) ताराबाई शिंदे यांनी स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार करून स्त्री-पुरुष समानतेची मागणी केली.
(७) रामस्वामी नायकर यांनी दक्षिण भारतात बालविवाह विरोधात लढा उभारला. स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा दिला.
(८) कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी आयुष्यभर स्त्रियांच्या हक्कांसाठी काम केले. स्त्री-मजूर, कारखान्यातील स्त्री- -कामगार यांच्यासाठी त्यांनी काम केले..
(९) बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी स्त्री-शिक्षणास प्रोत्साहन दिले. बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह, मुलींना माहेरच्या मिळकतीत वाटा असे पुरोगामी कायदे केले.
(१०) कोल्हापूरचे संस्थानिक राजर्षी शाहू महाराज यांनी मुला-मुलींसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून बेटीबंदीला विरोध केला.