प्रकरण ४ : वसाहतवाद आणि मराठे

प्र. (१) छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा.

उत्तर :

(१) छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली. अनेक धोके पत्करून स्वराज्याचा विस्तार केला.

(२) परकीयांचे छुपे हेतू वेळीच ओळखून त्यांना प्रतिकार केला.

(३) नौदल उभारले, जलदुर्ग बांधले, परकीयांच्या वसाहतवादाला विरोध करून स्वराज्याचे सार्वभौमत्व कायम टिकवले.

(४) इंग्रजांचा स्वराज्यातील मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यावर जकात बसवून स्वराज्यातील व्यापाराला संरक्षण दिले.

(५) परकीय सत्तेला स्वराज्यात व्यापार करण्याचा परवाना दिला तरी त्यावर अडीच टक्के जकात बसवली.

(६) राज्याभिषेकासाठी आलेल्या हेन्री ऑक्झिडेन याने शिवरायांशी केलेल्या तहानुसार शिवरायांनी इंग्रजांना स्वराज्यात वखारी उघडण्यास संमती दिली.

(७) परंतु इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठ्यांच्या राज्यात चालणार नाहीत, अशी भूमिका घेतली.

(८) याच तहात जहाजे फुटून किनाऱ्यास लागलेला इंग्रजांचा माल त्यास परत मिळावा, ही इंग्रजांची अट त्यांनी फेटाळून लावली.

(९) जंजिन्याच्या सिद्दीशी तह करावा व त्याची जहाजे बुडवू नयेत, ही अटही शिवरायांनी अमान्य केली.

(१०) स्वराज्याच्या धोरणात, कारभारात अन्य कोणाचा हस्तक्षेप शिवरायांनी कधीही सहन केला नाही. मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे त्यांचे धोरण यातून दिसून येते.

प्र. (२) भारतातील सर्वात प्रभावी असलेली मराठी सत्ता का संपुष्टात आली?

उत्तर : भारतातील सर्वांत प्रभावी असलेल्या मराठी सत्तेच्या अंताची कारणे:-

(१) नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे इंग्रजांना मराठयांच्याराज्यकार भारात प्रवेश मिळाला.

(२) रघुनाथन यांनी पेशवेपदासाठी झाजांकडे मदत मागितली व से इंग्रजांच्या आश्रयाला गेले.

(३) नाना फडणविसाने इंग्रजांविरुद्ध उभ्या केलेल्या चतु:संघातून इंग्रजांनी निजामाला फोडून आपल्या गोटात घेतले.

(४) मराठ्यांनी खड्यांच्या लढाईत निजामाचा पराभव केला, तरीही या लढाईत मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा अभ्यास करून त्या आधारे लॉर्ड वेलस्ली याने मराठ्यांचा पराभव केला.

(५) हिंदुस्थानात इंग्रजांची सत्ता स्थापन करायची असेल, तर मराठ्यांचा पराभव केला पाहिजे, असे वॉरन हेस्टिंग्जच्या लक्षात आल्यावर, त्याने त्याप्रमाणे योजना आखल्या.

(६) मराठा सरदारांना एकत्र आणून मुत्सद्दीपणाने कारभार करणाऱ्या नाना फडणविसांचा मृत्यू झाला.

(७) दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांना एकत्र ठेवू शकला नाही.

(८) इंदौरचे होळकर व पेशवा यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे यशवंतराव होळकर पुण्यावर आक्रमण केले. याने

(९) दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्याशी वसईचा तह केला.

(१०) शिंदे-होळकर यांना हा तह अमान्य होऊन १८०३ साली झालेल्या दुसऱ्या इंग्रज युद्धात मराठा सरदारांचा पराभव झाला.

(११) १८१७ साली झालेल्या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. १८१८ साली मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.

प्र. (३) ‘पोर्तुगीज आणि मराठे यांचे परस्परांसंबंधीचे राजकीय धोरण लवचीक होते, हे विधान उदाहरणे देऊन स्पष्ट करा.

उत्तर :

पोर्तुगिजांच्या वसाहतवादी धोरणाला छत्रपती शिवरायांनी नेहमीच विरोध केला. या दोघांत नेहमी कधी संघर्षाचे, तर कधी सहकार्याचे संबंध राहिले.

(१) सुरुवातीस मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करणाऱ्या पोर्तुगिजांनी सिद्दीविरोधात मराठ्यांनी केलेल्या कारवाईत सिद्दीला मदत केली.

(२) १६६५ मध्ये कर्नाटकच्या सागरी प्रदेशातून जाणाऱ्या मराठ्यांची १३ जहाजे पोर्तुगिजांनी जप्त केली व मराठ्यांच्या धाकामुळे पुढे ती सोडूनही दिली.

(३) १६६६ साली मराठ्यांनी आदिलशाहाच्या फोंडा किल्ल्याला वेढा दिलेला असताना पोर्तुगिजांनी किल्लेदाराला दारूगोळा पुरवला. परंतु सुरतेच्या स्वारीप्रसंगी याच पोर्तुगिजांनी शिवरायांना त्यांच्या प्रदेशातून सुखरूप स्वराज्यात येऊ दिले.

(४) मिझाराजे जयसिंग याच्या आक्रमणावेळी पोर्तुगिजांनी शिवाजी महाराजांना महानुभूती दाखवली.

(५) शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगिजांनी दाभोळ येथे वखार उघडली; मात्र पोर्तुगिजांनी वसाहतीत धर्मांतराला पोषक कायदे केल्यामुळे शिवरायांनी त्यांच्या सारदेशवर स्वारीही केली.

(६) आदिलशाही मराठे संघर्षात आदिलशाहाला मदत करणाऱ्या पोर्तुगिजांनी आपला वकील रायगडावर पाठवून संघर्ष टाळला. अशा अनेक उदाहरणांवरून हे लक्षात येते की, पोर्तुगीज आणि मराठे यांचे राजकीय पोरण लवचीक होते. या संबंधात परिस्थितीनुरूप बदल होत असत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 iaseasyway.com