प्रकरण १०: शीतयुद्ध
(१) शीतयुद्ध अधिक तीव्र होण्याची कारणे स्पष्ट करा?
उत्तर :
दुसऱ्या महायुद्धानंतर जगात सुरू झालेल्या शीतयुद्धाची तीव्रता वाढण्याची कारणे पुढीलप्रमाणे
होती :-
(अ) ‘मार्शल प्लॅन’ योजना :
(१) दुसरे महायुद्ध संपल्यावर अमेरिकेने युरोपीय राष्ट्रांना साम्यवादापासून रोखण्यासाठी ‘मार्शल प्लॅन’ योजना आखली.
(२) या योजनेनुसार अमेरिकेने आपल्या गटातील युरोपीय राष्ट्रांना आर्थिक मदत दयायला सुरुवात केली.
(३) याच्या विरोधात सोव्हिएट रशियाने आशिया आफ्रिका खंडांतील युरोपीय वसाहतींमधील स्वातंत्र्य चळवळींना प्रोत्साहन दिले.
(४) या कारणाने पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप यांच्यात तणाव निर्माण झाला.
(ब) विचारप्रणालीचा स्वीकार :
(१) साम्यवादी सोव्हिएट रशियाच्या विचारसरणीत उत्पन्नाच्या स्रोतांची सरकारी मालकी हा मध्यवर्ती विचार होता.
(२) उत्पन्नाच्या स्रोतांच्या खाजगी मालकीचा विचार हा अमेरिकेच्या भांडवलशाही विचारसरणीचा मध्यवर्ती विचार होता.
(३) विचारसरणीतील या फरकामुळे युरोप खंडाची राजकीय, आर्थिक, लष्करी या मुद्द्यांच्या आधारे विभागणी होऊन संघर्ष तीव्र झाला.
(क) बर्लिनची भिंत :
(१) १९६१ साली सोव्हिएट रशियाने बर्लिनची भिंत उभारली.
(२) या भिंतीमुळे पूर्व व पश्चिम जर्मनीचा सर्व प्रकारचा संबंध संपुष्टात येऊन तणाव अधिक वाढला.
(ड) क्यूबाचा पेचप्रसंग :
(१) क्यूबा देशाने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे तयार केली.
(२) क्यूबाच्या या क्षेपणास्त्रनिर्मितीमुळे अमेरिका-रशिया यांच्यातील तणाव अधिकच वाढला.
(ई) चीन कोरिया पेचप्रसंग :
(१) रशिया आणि चीन यांच्यात लष्करी करार झाला.
(२) उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संघर्ष तीव्र झाला. या घटनांमुळेही शीतयुद्ध तीव्र झाले.
अशा प्रकारे दोन विचारसरणींतील फरकामुळे अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊन जगात शीतयुद्ध अधिकाधिक तीव्र होत गेले.
प्र. (२) ‘सार्क’ संघटनेने केलेली कामगिरी स्पष्ट करा?
उत्तर :
‘सार्क’ संघटनेने पुढील क्षेत्रांत चांगली कामगिरी पार पाडली.
(१) बांग्लादेशात कृषिमाहिती केंद्र सुरू करून बी-बियाणे, पशुधन आणि मत्स्योत्पादन या क्षेत्रांत संशोधन सुरू केले.
(२) ढाका येथे सार्क हवामान संशोधन केंद्र स्थापन केले..
(३) काठमांडूमध्ये अस्थिरोग निवारण केंद्र सुरू केले.
(४) ‘सार्क’ सभासद-देशांमध्ये पर्यटनास चालना दिली गेली.
(५) आशिया-प्रशांत क्षेत्रीय आर्थिक व सामाजिक मंडळ’ स्थापन करून त्यामार्फत दक्षिण आशियातील गरिबी कमी करण्याचा ‘सार्क’ने प्रयत्न केला.
(६) व्यापारवृद्धीसाठी ‘उच्चस्तरीय आर्थिक सहकार्य मंडळ’ स्थापन करण्यात आले.
(७) ‘सार्क दस्तऐवज केंद्रा’च्या माध्यमातून माहिती पुरवण्याची सोय करण्यात आली.
(८) इस्लामाबाद येथे ‘सार्क मनुष्यबळ विकास केंद्र स्थापन करण्यात आले.
(९) सार्क सभासद देशांत अमली पदार्थ व्यापारविरोधी करार करण्यात आले.
(१०) डाकसेवा, दळणवळण अशांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर समित्या स्थापन करण्यात आल्या.
(११) दक्षिण आशियातील देशांमध्ये आपापसांतील व्यापार वृद्धिंगत व्हावा, म्हणून ‘दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार आणि २००४ मध्ये ‘दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र’ हे दोन करार करण्यात आले.