प्रकरण १० : शीतयुद्ध

प्र. (१) शीतयुद्ध

उत्तर :

(१) दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्रे व साम्यवादी राष्ट्रे यांच्यात सत्ता व प्रभाव यासाठी जो दीर्घकाळ संघर्ष सुरू झाला, त्या संघर्षाला ‘शीतयुद्ध’ असे म्हणतात.

(२) वॉल्टर लिपमन या स्तंभलेखकाने या संघर्षाला सर्वप्रथम ‘कोल्डवॉर’ (सीतयुद्ध) हा शब्दप्रयोग वापरला.

(३) दोन राष्ट्रगटांत तीव्र शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली. परस्परांतील अविश्वासातून राष्ट्रगट आक्रमक राजनीती करू लागला. अमेरिका व सोव्हिएट रशिया है या प्रत्येक गटांचे नेतृत्व करीत होते.

(४) प्रत्यक्ष युद्धाचा अभाव मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे, म्हणजे ‘शीतयुद्ध’ होय. दुसऱ्या महायुद्धानंतर १९९१ पर्यंत शीतयुद्धाची ही परिस्थिती जगात होती.

 

प्र. (२) अलिप्ततावाद

उत्तर :

(१) कोणत्याच राष्ट्रगटात सामील न होता स्वतंत्रपणे आपल्या देशाची धोरणे आखणे व सर्वांशी मैत्रीचे संबंध ठेवणे, या धोरणालाच ‘अलिप्ततावाद’ असे म्हणतात.

(२) भांडवलशाही राष्ट्रांचा गट व साम्यवादी राष्ट्रांचा गट या दोन्ही राष्ट्रगटांपासून अलिप्त राहून आपले परराष्ट्र धोरण ठरवणे, याला ‘अलिप्ततावाद’ असे म्हणतात.

(३) अलिप्ततावादात स्वत:च्या राष्ट्राचा विकास स्वतःच करणे, स्वतःची धोरणे स्वतःच ठरवून शांततेचा मार्ग स्वीकारणे या धोरणाचा समावेश होतो.

(४) ‘अलिप्ततावाद’ ही संकल्पना युद्धापेक्षा शांततेशी, शांततामय सहजीवनाशी अधिक निगडित आहे.

 

प्र. (३) नाटो संघटना

उत्तर :

(१) सोव्हिएट रशियाच्या विस्तारवादाविरुद्ध युरोपीय राष्ट्रांना लष्करी संरक्षण देण्यासाठी ‘नाटो’ (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन – १९४९) ही संघटना स्थापन झाली.

(२) अमेरिकेच्या नेतृत्वाखालील भांडवलशाही देश सभासद असलेल्या या संघटनेचे प्रमुख केंद्र पॅरिस येथे आहे.

(३) सभासद राष्ट्रांपैकी कोणत्याही राष्ट्रावरील आक्रमण हे सर्वांवरील आक्रमण मानले जाईल, असे नाटो कराराने निश्चित केले होते.

(४) नाटो सभासद देश शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी प्रयत्न करतील आणि नरस्पर विचारविनिमयाने प्रश्न सोडवतील, असेही नाटो करारात नमूद करण्यात आलेले होते.

 

प्र. (४) ‘सार्क’ संघटनेची उद्दिष्टे

उत्तर :

१९८५च्या ढाका परिषदेत ‘सार्क’ या संघटनेची पुढील उद्दिष्टे निश्चित करण्यात आली —

(१) सदस्य राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणे आणि विकासाचा वेग वाढवणे.

(२) दहशतवाद, अमली पदार्थांची तस्करी अशा विघातक गोष्टींना विरोध करणे.

(३) परस्पर विश्वास वाढवण्यासाठी सामंजस्याचे वातावरण निर्माण करून समस्या निवारण करणे.

(४) प्रादेशिक विभागीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समविचारी संघटनांशी सहकार्य करणे.

(५) आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाईक हितासाठी प्रयत्न करणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 iaseasyway.com