प्रकरण ९ : जग : निर्वसाहतीकरण
प्र. (१) आफ्रिकी ऐक्य कल्पना
उत्तर :
(१) ‘आफ्रिकी ऐक्याचा विचार’ पहिल्यांदा मांडणाऱ्या एच. एस. विल्यम्स याने इसवी सन १९०० मध्ये लंडन येथे पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली.
(२) या परिषदेला हजर असणाऱ्या डब्ल्यू. ई. बी. ट्यूब्वा या कृष्णवर्णीय नेत्याने आफ्रिकी ऐक्य कल्पनेला चालना दिली.
(३) त्याने १९१९ मध्ये पॅरिस येथे ‘अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली.त्याच्या पुढाकाराने पुढेही काही परिषदा भरवल्या गेल्या.
(४) या परिषदांमुळे आफ्रिका खंडात आफ्रिकी ऐक्याची कल्पना जनमानसात रुजू लागली.