प्रकरण ११ : बदलता भारत – भाग १
प्र. (१) भारत सरकारचे युवक धोरण
उत्तर : (१) भारत हा सर्वाधिक युवा लोकसंख्या असणारा देश असल्याने या काना शिक्षणाच्या संधी, कौशल्य उपलब्ध करून दिल्यास हा युवा वर्ग भारताच्या
विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो.
(२) या हेतूनेच १९७२ मध्ये ‘नेहरू युवा केंद्र संघटना’ ही संस्था स्थापन करण्यात दंडन युवकांना प्रशिक्षण देणे सुरू केले गेले. पुढे ‘राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम’ अंतर्गत साक्षरता, शिक्षण, आरोग्य व स्वच्छता, स्वयंरोजगार, पर्यावरण संरक्षण इत्यादी विषयांवर भर देण्यात आला.
(३) १२ जानेवारी हा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून इवला जाऊ लागला. युवकांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
(४) युवकांच्या साहसी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने भारतभर ८३ तिगृहे स्थापन केली. त्यामुळे युवा पर्यटन वाढले. एन. सी. सी., स्काऊट आणि गाईड यांच्या माध्यमांतून युवा वर्गाला सेवा, स्वयंशिस्त इत्यादी गुणांचे धडे दिले जातात. एकूणच युवक अधिकाधिक सक्षम, सेवाभावी व कुशल कसे होतील या दृष्टीने भारत सरकार आपले धोरण राबवत आहे.
प्र. (२) पोस्ट खाते
किंवा
तुमचे मत नोंदवा : एकविसाव्या शतकात पोस्टाचा चेहरामोहरा पूर्णतः बदलून गेला आहे
उत्तर :
अडीच शतके सेवा सुरु होउन गेलेल्या भारतीय टपाल खात्याचे काम पत्रांची देवाणघेवाण करणे हेच होते. मात्र एकविसाव्या शतकात पोस्टाने अन्य अनेक प्रकारच्या सेवा सुरू केल्या.
(१) पोस्टाने आर्थिक क्षेत्रात पदार्पण करून बचत खात्याखेरीज मुदत ठेवी, किसान व इंदिरा विकास पत्रे आदी योजना सुरू केल्या. २३५५७ पोस्ट ऑफिसेसचे रूपांतर ‘कोअर बँकिंग सोल्युशन मध्ये करण्यात आले.
(२) १९८६ पासून पोस्टाने ‘स्पीड पोस्ट सेवा’ सुरू केल्याने पोस्टाची सेवा अधिक गतिमान झाली.
(३) व्यावसायिक पार्सल, हवाई मालवाहतूक, पासपोर्ट सुविधा, ‘पोस्ट शॉप योजना’ इत्यादी अनेक योजना सुरू केल्या. यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात पोस्टाला महत्त्वपूर्ण स्थान मिळाले आहे.
प्र. (३) गॅट करार
उत्तर :
(१) दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक राष्ट्रांनी आपल्या राष्ट्राच्या हितासाठी संरक्षण जकात कर लावल्याने व्यापारात घट झाली.
(२) या समस्येवर चर्चा क्यूबामध्ये बोलावलेल्या ५४ देशांच्या बैठकीत एक कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
(३) त्यानंतर १९४७ मध्ये भरलेल्या जिनिव्हा परिषदेत जो करार संमत झाला, त्या करारास ‘गॅट करार’ असे म्हणतात..
(४) गॅट करार हा जगातील पहिला बहुउद्देशीय करार होय. या करारानुसार उत्पादन आणि विनिमय या मार्गांद्वारे आर्थिक विकास करणे, परममित्र राष्ट्रोचित व्यवहार (मोस्ट) फेव्हर्ड नेशन्स ट्रिटमेंट) करणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले. गॅट कराराचे पुढे जागतिक व्यापार संघटनेत (WTO) रूपांतर झाले.