Topic (5) बाजाराचे प्रकार ( forms of market)
प्रश्न 1) मक्तेदारीचे प्रकार सांगा?
उत्तर ÷ मक्तेदारीचे प्रकार खालील प्रमाणे आहेत
1)खाजगी मक्तेदारी ÷जेव्हा एखादी व्यक्ती खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचे नियंत्रण करते तेव्हा त्यास खाजगी मक्तेदारी म्हणतात .खाजगी मक्तेदारी ही नफ्याने प्रेरित झालेली असते. उदा.टाटा समूह.
2) सार्वजनिक मक्तेदारी÷ जेव्हा एखादी उत्पादन संस्था पूर्णतः सरकारच्या मालकीची ,सरकारने नियंत्रित केलेली आणि सरकारने चालवलेली असते ,तेव्हा त्यास सार्वजनिक मक्तेदारी असे म्हणतात. ही मक्तेदारी कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते. उदा.भारतीय रेल्वे
3) कायदेशीर मक्तेदारी÷ पेटंट ,बोधचिन्ह ,स्वामित्व अधिकार यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतात. नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हाच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास या मक्तेदारीत मनाई केली जाते तसेच या चिन्हाचे किंवा आकाराचे अनुकरण करण्यासाठी मनाई केली जाते. उदा.अमोलची उत्पादने .
4)नैसर्गिक मागतेदारी÷ विशिष्ट स्थल हवामान पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक मक्तेदारी असे म्हणतात. उदा. पंजाबचा गहू.
5)साधी मक्तेदारी ÷साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकमेव किंमत आकारते.
6) मूल्य भेदात्मक÷ मक्तेदारी मूल्य भेदात्मक मक्तेदारीत उद्योग संस्था एकच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारते. उदा. डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळे फी आकरतात.
7) ऐच्छिक मक्तेदारी÷ गळे कापूस स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार शुभेच्छा एकत्र येतात व मक्तेदारांचा गट स्थापन करतात. उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करून महत्तम नफा मिळवणे त्यामुळे सोयीचे होते. उदा. ,ओपेक( OPEC)
प्रश्न (2) अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये सांगा?
उत्तर ÷ अल्पाधिकार (oligopoly) या शब्दाची उत्पत्ती ग्रीक ‘oligol’ म्हणजे अल्पसंख्यांक आणि ‘ polis’ म्हणजे विक्रेत्या शब्दापासून झाली आहे. अल्प अधिकार म्हणजे असा बाजार की जात काही विक्रेते एकजन्सी वस्तूंचे किंवा विविध वस्तूंचे उत्पादन करतात. उदा.मोबाईल सेवा पुरवणारे, सिमेंट कंपनी, इत्यादी.
अल्प अधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे
1)काही विक्रेते÷ अल्प अधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात. बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते. तसेच त्यांची किमतीवर व वस्तूचे उत्पादनावर लक्षणीय नियंत्रण असते.
2)परस्परावलंबन÷ प्रतिस्पिर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते. या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योग संस्थांना ही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते.
3) जाहिरात÷ अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे .अल्पाधिकरात उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकते.
4) प्रवेशावर निर्बंध÷ कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात. परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी प्रवेश करताना तोंड द्यावे लागते .जसे की सरकारी परवाना पेटंट इत्यादी.
5) समानतेचा अभाव÷ उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते. कारण या काही आकाराने लहान तर काही मोठे असतात .
6)अनिश्चितता÷ या बाजारात लक्षणीय विचारात घेणे इतपत निश्चितता असते कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाच्या स्वरूप विविध प्रकारचे असते. प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांच्या हात मिळवणे करून एकमेकांना सहकार्य ही करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्ष ही करू शकतात.
प्रश्न (3) बाजाराचे वर्गीकरण स्पष्ट करा?
उत्तर ÷ बाजाराचे वर्गीकरण खालील प्रमाणे करता येते.
।)स्थळानुसार :
1)स्थानिक बाजारपेठ ÷स्थानिक बाजार म्हणजे असा बाजार की जात ग्राहक वस्तूंचे उत्पादन ज्या ठिकाणी होते. त्या ठिकाणाहून वस्तू खरेदी करतात.
2)राष्ट्रीय बाजारपेठ÷ राष्ट्रीय बाजार आदेशांतर्गत बाजार होय प्रत्येक राष्ट्रीय बाजार पेटवला त्या देशातील नियम लागू होतात.
3) आंतरराष्ट्रीय बाजारपेठ÷ आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या जागतिक बाजारपेठ असून त्यामध्ये राष्ट्रीय सीमा व लांडून वस्तू व सेवांचे आदान प्रदान होते.
॥)काळानुसार
1)अत्यल्पकाळ÷ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही. त्यामुळे वस्तूची किंमत मागणी निर्धारित करते हा काळ काही दिवसांचा किंवा आठवड्यांचा असतो. ज्यात वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही .
2)अल्पकाळ÷ अल्पकाळ हा एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आधनांचे उदा. श्रम समायोजन करून वस्तूंचा पुरवठा वाढविता येणे शक्य आहे.
3)दीर्घकाळ ÷दीर्घकाळ हा कालावधी होईल ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते. दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाची जुळवून घेणे शक्य होते हा कालावधी काही वर्षाचा असतो. उदा. साधारणपणे 5 वर्षापर्यंत.
4) अति दीर्घकाळ÷ अति दीर्घकाळ म्हणजे सकाळच्या मध्ये उत्पादनाचे सर्व आदाने स्थिर आणि बदलते बदलता येणे शक्य असते. हा कालावधी 5 वर्षांपेक्षा अधिक असतो.