प्रकरण ९: जग निर्वसाहतीकरण

प्र. (१) म्यानमारच्या स्वातंत्र्याविषयी माहिती लिहा.

उत्तर :

(१) इसवी सन १५९९ मध्ये पोर्तुगिजांनी म्यानमारच्या राजाचा पराभव करून म्यानमारची सत्ता ताब्यात घेतली.

(२) १६११ मध्ये म्यानमारमधील विविध राजघराणी एकत्र येऊन त्यांनी पोर्तुगिजांचा पराभव केला व देशाचे एकत्रीकरण केले.

(३) या सत्तेने आक्रमक धोरण स्वीकारत भारताच्या मणिपूरवर व आसामवर प्रभुत्व प्राप्त केले.

(४) ब्रिटिशांच्या प्रदेशावर हे आक्रमण असल्याने १८२६ मध्ये ब्रिटिशांनी म्यानमारशी पहिले युद्ध केले व आसाम, मणिपूर हे प्रदेश जिंकून घेतले.

(५) दुसऱ्या ब्रह्मी युद्धातही ब्रिटिशांनी म्यानमारचा पराभव केला.

(६) फ्रान्सने म्यानमारमधील ‘अप्पर बर्मा’ हा भाग जिंकला, त्यामुळे तिसरे ब्रह्मी बुद्ध झाले. या युद्धात इंग्रजांनी मंडाले हा भाग जिंकला.

(७) त्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार जिंकून तो एक प्रांत म्हणून भारतात समाविष्ट केला.

(८) १९३५च्या कायदयानुसार ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला. ब्रिटिशांनी म्यानमारला स्वयंशासनाची मुभा दिली.

(९) १९३७ नंतर ऑग सॅन यांच्या नेतृत्वाखाली बर्मी लोकांनी ‘बर्मा इंडिपेन्डन्स आर्मी’ ही संघटना स्थापन केली.

(१०) म्यानमारमध्ये झालेली ब्रिटिशांची पीछेहाट अमेरिकेच्या मदतीने सावरली गेली. १९४५ मध्ये पुन्हा ही सत्ता अधिक मजबूत करण्यात आली.

(११) सत्ता मजबुतीसाठी लोकमताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे लक्षात घेऊन ब्रिटिशांनी आँग सॅन यांना उपाध्यक्ष बनवले. अखेरीस ४ जानेवारी १९४८ रोजी ब्रिटिशांनी म्यानमारला स्वातंत्र्य दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 iaseasyway.com