प्रकरण ३: भारत आणि युरोपीय वसाहतवाद
प्र. (1) पोर्तुगिजांनी भारतात कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या?
उत्तर : पोर्तुगिजांनी भारतात पुढील ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या.
(१) पोर्तुगिजांनी प्रथम अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवर वर्चस्व निर्माण केले.
(२) आपल्या आरमारी सामर्थ्यावर त्यांनी पश्चिम किनाऱ्यावर वसाहती स्थापन केल्या. गोवा ही पोर्तुगिजांच्या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी होती.
(३) दीव, दमण, चौल, गोवा (साष्टी व बारदेश), वसई येथे मुंबईला लागून वसाहती स्थापन केल्या.
(४) दक्षिण भारतात पश्चिम किनारपट्टीवर होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडुंगल्लूर, कोची आणि कोल्लम या कर्नाटकच्या व केरळच्या प्रदेशांत वसाहती उभारल्या.
(५) भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नागपट्टिणम, मयिलापूर आणि बंगालमध्ये हुगळी येथेही पोर्तुगिजांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या.