प्रकरण ८ : जागतिक महायुद्धे आणि भारत
प्र. (१) ‘कामा गाटा मारू’ घटना
उत्तर :
(१) पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतातील अनेक लोक स्थलांतर करून अमेरिका, कॅनडा येथे जाऊ लागले.
(२) ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणात असलेल्या कॅनडाच्या सरकारने भारतीय स्थलांतरितांना आश्रय देण्याचे नाकारले. बाबा गुरुदितसिंग यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या ‘कामा गोटा मारू’ या नावाच्या जहाजाला कॅनडाने आपल्या बंदरात येण्यास नकार दिला.
(३) तेथून घालवून देण्यात आलेले हे जहाज परत कोलकात्याजवळील ‘बजर या बंदरात पोहोचले.
(४) जहाजावरील उतारूंनी ताबडतोब आपल्या गावी जाण्याचा इंग्रज अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश जहाजावरील लोकांनी मोडला. इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ३० लोक ठार झाले. “कामा गाटा मारू’ घटनेमुळे इंग्रजांविषयी देशभर चीड निर्माण झाली.
प्र. (२) डॉ. कोटणीस
उत्तर :
(१) १९३७ साली जपानने चीनवर आक्रमण केले, तेव्हा चीनने जखमी सैनिकांवर औषधोपचारासाठी डॉक्टरांची मदत मागितली. पंडित नेहरूनी चीनमध्ये पाठवलेल्या पाच डॉक्टरामध्ये डॉ. कोटणिसांचा समावेश होता.
(२) डॉ. द्वारकानाथ कोटणिसांनी जपानी आक्रमणाच्या काळाबरोबरच दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही चीनच्या जखमी सैनिकांची सेवा केली.
(३) आपल्या त्यागातून आणि समर्पण वृत्तीतून त्यांनी भारत व चीन या देशांत मैत्रीचे संबंध निर्माण केले.
(४) पाच वर्षे चिनी सैनिकांची देखभाल करणाऱ्या डॉ. कोटणिसांचे ५ डिसेंबर १९४२ रोजी प्लेगच्या साथीत चीनमध्येच निधन झाले.
प्र. (३) सॅम माणेकशॉ
उत्तर :
१९३४ ते २००८ एवढ्या प्रदीर्घ काळात कमांडर ते स्थलसेनाध्यक्ष पदा काम केलेले सॅम माणेकशॉ हे एकमेव सेनानी होते.
(१) दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १७ इन्फंट्री डिव्हिजन अंतर्गत माणेकशॉ यांना ब्रह्मदेशात जपानी हल्ले रोखण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यावेळी ते या मोहिमेचे प्रभारी कमांडर होते.
(२) त्यांच्या तुकडीने सितांग ब्रिजवर हल्ला केला. हे महत्त्वाचे ठाणे जिंकताना सॅम माणेकशॉ यांना नऊ गोळ्या लागल्या.
(३) त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल कमांडिंग ऑफिसर कोवान यांनी त्यांना ‘मिलिटरी क्रॉस हे पदक बहाल केले.
((४) स्वतंत्र भारतात ते स्थलसेनेचे सेनाध्यक्ष (जनरल) झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत–चीन व भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धे लढली गेली. बांग्लादेश स्वतंत्र करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
(५) भारतातील पहिले ‘फील्डमार्शल’ हा बहुमान त्यांना मिळाला.