प्रकरण ७ : भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण

प्र. (१) निर्वसाहतीकरण

उत्तर :

(१) वसाहतवादयांचे वसाहतींवरील वर्चस्व संपुष्टात येणे आणि त्यांनी निक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्द करणे, यालाच ‘निर्वसाहतीकरण’ असे म्हणतात.

(२) २०जे शतक हे नाती तक मानले जाते.

(३) वसाहतवादी राष्ट्रांकडून होणारी शिक्षणातून मिळालेली स्वातंत्र्य व समता इत्यादी मूल्ये त्यांतून निर्माण झालेला राष्ट्रवाद यांमुळे वसाहतींमध्ये स्वातंत्र्यल उभे राहिले.

(४) वसाहतवादाला विरोध, स्वातंत्र्यलढा आणि नंतर मिळालेले स्वातंत्र्य हे निकरणाचे तीन टप्पे आहेत. भारतालाही याच मार्गाने स्वातंत्र्य मिळाले.

प्र. (२) डॉ. टी. बी. कुन्हा

उत्तर :

(१) १९२८ साली मुंबईत स्थापन झालेल्या ‘गोवा काँग्रेस कमिटी ‘चे डॉ. टी. बी. कुन्हा हे प्रमुख होते.

(२) पोर्तुगालच्या ताब्यातील भारतीय प्रदेश मिळवण्यासाठीच्या लढ्यात आघाडीवर हून त्यांनी पोर्तुगीज सरकारविरुद्ध जनतेत जागृती घडवून आणली.

(३) मडगाव येथील सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना व त्यांच्या अम्य महकाऱ्यांना अटक झाली.

(४) डॉ. कुल्हा यांना आठ वर्षे पोर्तुगालमधील तुरुंगात ठेवण्यात आले.

(५) तुरुंगातून मुक्त झाल्यावर त्यांनी मुंबईत ‘आझाद गोवा’ आणि ‘स्वतंत्र गोवा’ वृत्तपत्रे सुरू करून गोवा मुक्तीसाठी जनमत घडवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 iaseasyway.com