प्रकरण ५: भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा
प्र. (१) प्रार्थना समाज
उत्तर :
(१) डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, न्यायमूर्ती म.गो. रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर यांनी प्रार्थना सभेची स्थापना केली. प्रार्थना सभेने जनहिताची अनेक कामे केली.
(२) प्रार्थना सभेने मूर्तिपूजेस विरोध केला. एकेश्वरवादास प्राधान्य दिले. कर्मकांडांना विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. पारमार्थिक जीवनापेक्षा ऐहिक जीवनाला अधिक महत्त्व दिले.
(३) कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. स्त्री-शिक्षण संस्थांची स्थापना केली आणि स्त्री-पुरुष समानतेची चळवळ सुरू केली.
(४) समाजातील जातिभेदांना विरोध केला. अनाथालये सुरू केली.
प्र. (२) सत्यशोधक समाज
उत्तर :
महात्मा जोतीराव फुले यांनी १८७३ साली पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाने पुढील विचारसरणीचा पुरस्कार केला.
(१) एकेश्वरवादाचा स्वीकार व मूर्तिपूजेला विरोध.
(२) वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारले आणि विवेचक बुद्धीचे प्रामाण्य स्वीकारले.
(३) पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थीला विरोध.
(४) चमत्कारांवर अविश्वास व तीर्थयात्रेला विरोध
(५) परलोक कल्पनेला विरोध.