प्रकरण ३ : भारत आणि युरोपीय वसाहतवाद
प्र. (१) पोर्तुगिजांची युद्धनीती
उत्तर:
आपल्या प्रबळ आरमाराच्या मदतीने पोर्तुगिजांनी भारतात वसाहती स्थापन केल्या. त्यासाठी त्यांना त्यांची युद्धनीतीही उपयुक्त ठरली.
(१) पोर्तुगिजांनी वसाहतींच्या रक्षणासाठी किल्ले उभारले.
(२) किल्ल्यांच्या आधारे ते बाह्य हल्ल्यांपासून वसाहतींचे रक्षण करीत असत.
(३) समुद्रमार्गे किल्ल्यांना रसद पुरवत असत.
(४) किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूख उद्ध्वस्त करायचा, ही तुगिजांची युद्धनीती होती.
(५) भारतातील राजांच्या आपापसांतील भांडणांचा फायदा घेणे, हाही त्यांच्या युद्धनीतीचाच एक भाग होता.
प्र. (२) कर्नाटक युद्धे
उत्तर :
(१) कर्नाटकच्या प्रदेशावर नवाबाची सत्ता होती व हे नवाबपद मिळवण्यासाठी नवाबाच्या घराण्यात सत्तासंघर्ष चालू होता.
(२) या प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्यासाठी ही संधी आहे, असे ओळखून ब्रिटिश आणि फ्रेंच यांनी या सत्तासंघर्षात हस्तक्षेप सुरू केला.
(३) त्यातूनच इसवी सन १७४४ ते १७६३ या काळात इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली. या युद्धांनाच ‘कर्नाटक युद्धे’ असे म्हणतात..
(४) तिसऱ्या कर्नाटक युद्धात फ्रेंचांचा पराभव झाल्याने इंग्रजांना भारतात प्रबळ असा युरोपीय स्पर्धक उरला नाही.