प्रश्न 1) सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
उत्तर÷ सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य खालील प्रमाणे
1) वैयक्तिक घटकांचा अभ्यास÷ सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती ,यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो.
2) किंमत सिद्धांत÷ सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितींशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे .म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात.
3) अंशिक समतोल÷ दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र विश्लेषण म्हणजे अंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आवश्यक समतोलमध्ये एक उपभोक्ता ,एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग, इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते .अंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वातंत्रपणे अभ्यास केला जातो.
4) विशिष्ट गृहीतकांवर आधारित ÷ इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते .पूर्ण रोजगार ,शुद्ध भांडवलशाही ,पूर्ण स्पर्धा, सरकारचे नेहरस्तक्षेपाची धोरण, इत्यादी गृहीतकावर आधारित असते. या गृहीतकांमुळे सिद्धांताचे विवेचन सोपे होते.
5) विभाजन पद्धत÷ सूक्ष्मलक्ष्मी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेची लहानात लहान व्यक्ती घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वातंत्रपणे ,तपशीलवार अभ्यास
केला जातो .म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदा. राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणी मधील
वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी.
6) सीमांत तत्वाचा वापर÷ सीमांत संकल्पना ही सूक्ष्म- आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढवून नगामुळे एकूण परी नामात होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम, उत्पादक व उपभोक्त्याच्या आर्थिक निर्णय घेताना केला जातो.
7) बाजार रचनेचे विश्लेषण÷ सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा ,मक्तेदारीयुक्त स्पर्धा ,मक्तेदारी ,अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते.
8) मर्यादित व्याप्ती÷ सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी-मंदी, व्यवहारतोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी ,लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रवादी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकापूर्ती मर्यादित आहे.
प्रश्न 2) स्थूल अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट करा?
उत्तर ÷ स्थूल अर्थशास्त्राचे महत्व खालील प्रमाणे
1) अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती÷ स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीचे अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते.
2) आर्थिक चढउतार÷ उत्पन्नातील चढ-उतार उत्पादन आणि रोजगारातील चढ -उतारांची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करते.
3) राष्ट्रीय उत्पन्न÷ स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि “सामाजिक लेखा”
यांचे अनन्यसाधारण महत्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करता येत नाही.
4) आर्थिक विकास÷ स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न, व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते. ते आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करते.
5) अर्थव्यवस्थेची कामगिरी÷ संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळ अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. एका कालावधीत उत्पादित वस्तू व सेवांचे तुलना दुसऱ्या कालावधीत उत्पादित असतो सेवांशी केली जाते.
6) स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास÷ अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी “स्थूल आर्थिक चलांचा” अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारखे आर्थिक चलांशी संबंधित आहेत.
7) सामान्य रोजगार पातळी÷ स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते.
प्रश्न 3) स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा?
उत्तर ÷ स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती खालील प्रमाणे
1) उत्पन्न व रोजगार सिद्धांत÷ स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते .तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे.
2) सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत÷ स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढउताराची कारणे याविषयी विश्लेषण करते. त्यामुळे ते तेजी व मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. तेजी आणि मंदीने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो.
3) आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत÷ स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधी सिद्धांताचा समावेश होतो. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढवण्याची व्युहरचना सुचवली जाते सुचवली जाते.
4) विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत÷ स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत ,एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन ,व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडित आहे.
प्रश्न 4) स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
उत्तर ÷ स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे
1) समग्र घटकांचा अभ्यास÷ स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते .उदा. राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी ,व्यापार चक्र इत्यादी.
2) उत्पन्न सिद्धांत÷ स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्यांचे विविध घटक ,मापन पद्धती आणि “सामाजिक लेखांकनाचा” अभ्यास करते .ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे .तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ-उतार व्यापार चक्रातील तेजी-मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते.
3) सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण÷ स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी पुरवठा व किंमत यांच्यावर त्यांची निगडित आहे.
4) परस्परावलंबन÷ स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले उदा. उत्पन्न, उत्पादन रोजगार, गुंतवणूक, किंमतपातळी यांसारखे आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते .उदा. गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम ,उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार, आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो.
5) राशी पद्धत
÷ राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो प्रा .बोल्डिंग यांच्या मते ,”जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो; परंतु त्या एका विशिष्ट झाडांची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत.” यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शवला जातो.
6) वृद्धीचे प्रारूपे÷ स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो.स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात.विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदा. मूलभूत व अवजड उद्योगावर भर देणारे महालनोबिस वृद्धी प्रारूप.
7) सर्वसाधारण किंमत पातळी÷ स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतींची सरासरी होय.
8) धोरणाभिमुख÷ लॉर्ड केन्स यांच्या मते “स्थूल अर्थशास्त्र आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे”उदा.भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी.